स्वर्णप्राश विधी
Immunobooster for Children
आयुर्वेदातील अनेक ग्रंथांमधे स्वर्णप्राश विधीचा उल्लेख मिळतो. व्याधिप्रतिकाशक्ती वढवण्यासाठीच्या उपक्रमांपैकी सर्वोत्तम असा हा उपक्रम आहे. प्राचीन काळात आचार्यांनी यासंबंधीचे अनेक संदर्भ ग्रंथात नमूद केले आहेत. स्वर्णप्राशन विधी हा प्रामुख्याने लहान मुलांसाठी सांगण्यात आलेला आहे. काश्यप संहिता ज्यामधे विशेषकरून लहान मुलांच्या आजारासंबंधी व आरोग्यासंबंधी वर्णन केले आहे, आचार्य काश्यप स्वर्णप्राशनाचे फायदे सांगतात –
स्वर्णप्राश ही एतय मेधाग्नि बळवर्धनम् ।
आयुष्यं मंगलम् पुण्यम् वृष्यम् गृहापहम् ।।
मासत परमामेधावे व्याधिर्भिच दृष्यते ।
षड्भि:मासै श्रृतधार स्वर्णप्राशनात भवेत् ।।
- का. सू.
1) मेधा वृध्दी – मुलांची स्मरणशक्ती वाढते.
2) अग्नि वृध्दी – मुलांची पचनशक्ती सुधारते .
3) बलवर्धन – मुलांचे शारीरीक व मानसिक बल वाढते.
4) आयुष्यं – रोगप्रतिकार शक्ती वाढल्याने आयुर्मान वाढते.
5) परम् मेधावी – ( महिना सेवन केल्याने ) ग्रहणक्षमता, आकलनक्षमता व स्मरणशक्ती
( धी- धृती – स्मृती ) अशा सर्वांगाने बैाध्दिक विकास होतो.
6) श्रृतधार - सहा महिने सेवन केल्यास मुले एकदा ऐकल्यावर लक्षात ठेवण्याश्तके
हुशार होतात.
स्वर्ण, ब्राहमी, शंखपुष्पी, वेखंड आदी बुद्धिवर्धक काष्ठ औषधी सिद्ध तूप व मध विधिवत एकत्र करून ते मिश्रण बालकास दिले जाते.
स्वर्णप्राश नक्षत्रातील सर्वोत्तम नक्षत्र – पुष्य नक्षत्रावर दिले जाते.
पुष्य नक्षत्र तारखा – 2024
25 जानेवारी | 03 ऑगस्ट |
21 फेब्रुवारी | 30 ऑगस्ट |
19 मार्च | 26 सप्टेंबर |
16 एप्रिल | 24 ऑक्टोबर |
13 मे | 20 नोव्हेंबर |
9 जून | 18 डिसेंबर |
7 जुलै |
स्वर्णप्राश वयोमर्यादा किती ?
जन्माला आल्यापासून ते वयाच्या 16 वर्षापर्यंत देता येते.
प्रत्येक बालकाची प्रकृती व वय यानुसार वैद्य सल्ल्याने मात्रा द्यावी.
वयवर्ष 16 पर्यंत प्रत्येक पुष्य नक्षत्रावर द्यावे.